डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संजय गायकवाड गाण्यावर थिरकले, बघा व्हिडीओ
VIDEO | डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बुलढाणा येथील मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड गाण्यावर थिरकले, बघा भन्नाट डान्स
बुलढाणा : राज्यभरात काल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांसह राजकीय नेते मंडळी यांनी देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बुलढाणा येथे शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी बुलढाणा येथील तरुण मंडळींचा मोठा सहभाग या मिरवणुकीत पाहायला मिळाला होता. तर यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा डीजेवर ठेका धरला आणि ते गाण्यावर बेधुंद थिरकताना दिसले. यामुळे तरुणाचा उत्साह वाढला. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत असताना काल आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा मिरवणुकीत डान्स करून सर्वांचा उत्साह वाढवला. तरुणांनी सुद्धा आमदार गायकवाड यांना उचलून घेतले असल्याचे पाहायला मिळाले.