Sanjay Gaikwad : संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ; व्हिडीओ व्हायरल
आमदार संजय गायकवाड यांचा बुलढाणा जिल्ह्यातील जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी एका सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला निवडणुकीत मतदान कमी मिळाले यामुळे नाराजी व्यक्त केली.
बुलढाण्यातील जयपूरमध्ये जाऊन मतदारांसंदर्भात अनेक आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे पाहायला मिळाले. मतदारांपेक्षा XX बऱ्या, मतदारांना फक्त दारू, मटण पाहिजे, मतदार विकले गेले आहेत, असं वक्तव्य करत आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना शिव्यांची लाखोली वाहिली. आमदार संजय गायकवाड यांचा बुलढाणा जिल्ह्यातील जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी एका सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला निवडणुकीत मतदान कमी मिळाले यामुळे नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. जाहीर भाषणात आमदार गायकवाड हे मतदारांवर भडकले असल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, तुम्हाला फक्त दारू, मटण, पाचशे रुपये पाहिजे. मतदार दोन दोन हजारात विकले गेले. XXXXअसे म्हणत यांच्यापेक्षा XX बऱ्या. याप्रकारे मतदारांना संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली. त्यांचा तो व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.