शिवसेनेचे 'हे' तीन मंत्री केंद्रात जाणार, संजय शिरसाट यांचा मोठा दावा काय?

शिवसेनेचे ‘हे’ तीन मंत्री केंद्रात जाणार, संजय शिरसाट यांचा मोठा दावा काय?

| Updated on: Mar 14, 2024 | 1:16 PM

संदीपान भुमरे हे संभाजीनगरमधून लोकसभा लढवणार आहेत. तर तानाजी सावंत हे धाराशिवमधून लोकसभा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासह यवतमाळ-वाशिममधून संजय राठोड हे लोकसभा लढवण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर भावना गवळी यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापलं जाणार?

मुंबई, १४ मार्च २०२४ : शिवसेनेचे तीन मंत्री केंद्रात जाणार असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. संदीपान भुमरे हे संभाजीनगरमधून लोकसभा लढवणार आहेत. तर तानाजी सावंत हे धाराशिवमधून लोकसभा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासह यवतमाळ-वाशिममधून संजय राठोड हे लोकसभा लढवण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर भावना गवळी यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. ‘काही लोकं जेष्ठ आहेत. त्यांनी आता लोकसभेत जावं. असं काही आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील मत आहे. त्यामुळे तीन मंत्री तरी यंदा केंद्रात खासदारकीची निवडणूक लढवतील’, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं. शिवसेनेच्या तीन मंत्र्यांना लोकसभेचं तिकीट मिळणार आहे… या नावांची घोषणा लवकरच होईल. मुख्यमंत्री स्वतः त्या नावांची घोषणा करतील, असेही शिरसाट म्हणाले.

Published on: Mar 14, 2024 01:16 PM