शिवसेनेचं नेतृत्व राज ठाकरेंना देण्यास विरोधच, शिंदेंचे आमदार शहाजीबापू पाटील कडाडले
राज ठाकरे यांच्या हाती शिवसेनेचं नेतृत्व जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही, अशा शब्दात शहाजी बापू पाटील कडाडल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाही तर त्यांनी थेट राज ठाकरे यांच्या नावाच विरोध केलाय. राज ठाकरे जर महायुतीत येऊन जर त्यांच्याकडे शिवसेनेचं नेतृत्व जात असेल तर...
राज ठाकरे जर महायुतीत येऊन जर त्यांच्याकडे शिवसेनेचं नेतृत्व जात असेल तर त्याला आपला विरोध असल्याचे शिंदेंचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांच्या हाती शिवसेनेचं नेतृत्व जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही, अशा शब्दात शहाजी बापू पाटील कडाडल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाही तर त्यांनी थेट राज ठाकरे यांच्या नावाच विरोध केलाय. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेट… यानंतर मुंबईत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक…यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरे यांच्या हाती द्यावं, अशी खलबतं या बैठकीत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाल्याची माहिती मिळतेय. मात्र अशी आमची चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झाली नाही, पण मनसेला महायुतीत घेण्यासंदर्भात महायुतीत चर्चा झाल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.