टोलनाके चालवणारे आमच्या राजघराण्यात जन्माला कसे, उदयनराजे यांच्यावर जोरदार हल्लाबोल
VIDEO | साता-यातील गोडॊली तळ्याच्या सुशोभिकरणावेळी खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर केलेल्या टीकेवर काय दिलं शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर बघा..
सातारा : टोलनाके चालवणारे उदयनराजे आमच्या राजघराण्यात जन्माला आलेच कसे, असा सवला उपस्थित करत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. साता-यातील गोडॊली तळ्याच्या सुशोभिकरणावेळी खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टिका केली होती, या टीकेला शिवेंद्रराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उदयनराजे आमच्या या राजघराण्यात जन्माला आलोच कसा असा प्रश्न उदयनराजे यांनी केलाय. मात्र टोलनाके चालवणारेच आणि अन्यायकारक या घरात कसे जन्माला आले हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांच्या जिव्हारी लागणारी टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टीकेनंतर उदयनराजे काय उत्तर देणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.