Buldana | फटके देऊन सरळ करावं लागेल, श्वेता महालेंनी बँक व्यवस्थापकाला खडसावलं
आमदार महाले ह्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेला होल्ड का लावला म्हणून चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काल गेल्या होत्या. यावेळी महाले यांनी मॅनेजरला धारेवर धरत शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेला होल्ड काढण्यास भाग पाडल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. यावेळी आमदार महाले यांनी मॅनेजरला मारण्याची भाषाही केलीय.
बुलढाणा : अतिवृष्टीची मिळालेली मदत आणि पिकविम्याची आलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना न देता परस्पर शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात वळती करून किंवा त्या खात्याला होल्ड लावणाऱ्या चांडोळ येथील बँक व्यवस्थापकास आमदार श्वेता महाले यांनी चांगलेच धारेवर धरत एकेरी भाषेत झापले. यावेळी मॅनेजरला माफीसुदधा मागायला लावली. आमदार महाले ह्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेला होल्ड का लावला म्हणून चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काल गेल्या होत्या. यावेळी महाले यांनी मॅनेजरला धारेवर धरत शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेला होल्ड काढण्यास भाग पाडल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. यावेळी आमदार महाले यांनी मॅनेजरला मारण्याची भाषाही केलीय.
Latest Videos