शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात आमदार वैभव नाईक यांचा मोठा दावा, म्हणाले…
VIDEO | येत्या १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शिवसेनेच्या आमदारांची होणार सुनावणी, शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात कुडाळ - मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काय व्यक्त केला विश्वास?
सिंधुदुर्ग, १२ सप्टेंबर २०२३ | शिवसेना आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीची तारीख आणि वेळ निश्चित केल्यानुसार येत्या १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी होणार आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्याच समोर एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात १४ सप्टेंबर म्हणजेच गुरुवारपासून होणाऱ्या या सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या म्हणजे शिंदे गटातील ४० आमदारांना तर उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. याबाबत आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास असून ते १६ आमदार अपात्र ठरतील असा विश्वास कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलाय.