लोकसभेला पाठिंबा पण मदतीच्या बदल्यात आता मदत नाही? 'या' निवडणुकीत मनसे विरोधात भाजप देणार उमेदवार?

लोकसभेला पाठिंबा पण मदतीच्या बदल्यात आता मदत नाही? ‘या’ निवडणुकीत मनसे विरोधात भाजप देणार उमेदवार?

| Updated on: May 29, 2024 | 10:00 AM

विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीत भाजप मनसेला मदत करण्याच्या काही मूडमध्ये दिसत नाहीये. कोकण पदवीधर निवडणुकीसाठी मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तर यावेळी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्यात

लोकसभा निवडणुकीत मनसेने अर्थात राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि प्रचारही केला. पण विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीत भाजप मनसेला मदत करण्याच्या काही मूडमध्ये दिसत नाहीये. कोकण पदवीधर निवडणुकीसाठी मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तर यावेळी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्याचे अभिजीत पानसे यांनी सांगितले. पण लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला त्याबद्दल धन्यवाद आणि चर्चा न करता पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवार दिला यासाठी भाजप नेते आशिष शेलार यांनी शुभेच्छा दिल्यात. दरम्यान, महायुतीला पाठिंबा दिल्यानंतरही पदवीधर निवडणुकीत भाजपने मनसेच्या विरोधात उमेदवार देण्याची तयारी केली आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: May 29, 2024 10:00 AM