मुंबई शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, तिकीट दिलं तर भाजपकडून, नाही तर अपक्ष, कुणी घेतले दोन अर्ज?
भाजपकडून इच्छुक अनिल बोरनारे यांनी दोन उमेदवारी अर्ज घेतले आहे. भाजपकडून इच्छुक अनिल बोरनारे यांनी एक भाजपच्या नावे तर दुसरा अपक्ष म्हणून अर्ज घेतला आहे. त्यामुळे मुंबई शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून इच्छुक अनिल बोरनारे यांनी दोन उमेदवारी अर्ज घेतले आहे. भाजपकडून इच्छुक अनिल बोरनारे यांनी एक भाजपच्या नावे तर दुसरा अपक्ष म्हणून अर्ज घेतला आहे. दरम्यान, भाजपकडून इच्छुक असणाऱ्या अनिल बोरनारे यांनी दोन अपक्ष अर्ज घेतल्यानंतर महायुतीमध्ये बंडखोरी होणार का? असा सवाल करत आता शंका उपस्थित केली जात आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव नलावडे यांना यापूर्वी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आयोगाकडून राज्यातील चार जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदार होणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी १ जुलै रोजी होणार आहे.