पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, मुंबईतून ठाकरे आणि शिंदे गटाकडून ‘ही’ नावं आघाडीवर
लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ काल महाराष्ट्रात विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून झाली आहे. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात १० जूनला मतदान होणार आहे. मुंबईतील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत कुणाची नावं चर्चेत?
मुंबईतील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत ठाकरे गटाकडून अनिल परब आणि सरदेसाई यांची नावं आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून डॉ. दीपक सावंत यांच नाव सध्या चर्चेत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ काल महाराष्ट्रात विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून झाली आहे. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात १० जूनला मतदान होणार आहे. राज्यातील चार जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. तर या चारही जागांवरील विद्यमान आमदारांचा कार्यकाळ हा येत्या ७ जुलै रोजी संपणार आहे. या चार जागांसाठी १० जूनला मतदार होणार आहे.