नागपुरात मनसेचं खळ्ळखट्याक अन् अॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड, काय आहे कारण?

नागपुरात मनसेचं खळ्ळखट्याक अन् अॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड, काय आहे कारण?

| Updated on: Aug 22, 2023 | 6:33 PM

VIDEO | मनसेचे अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षाचे झेंडे आणि तिरंगा घेऊन अॅमेझॉन कार्यालयात घुसले आणि अॅमेझॉनवर पाकिस्तानी झेंडे विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपनीच्या विरोधात केली घोषणाबाजी

नागपूर, २२ ऑगस्ट २०२३ | वेबसाईटवर पाकिस्तानी राष्ट्रध्वजांच्या विक्रीच्या निषेधार्थ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी नागपूर येथील ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी मनसेचे अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षाचे झेंडे आणि तिरंगा घेऊन अॅमेझॉन कार्यालयात घुसले आणि अॅमेझॉनवर पाकिस्तानी झेंडे विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी केली.दरम्यान, निषेध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनने पाकिस्तानी राष्ट्रध्वजांची विक्री केल्याबद्दल माफी मागावी आणि अॅमेझॉन वेबसाइटवर ध्वजांची ऑनलाइन विक्री बंद करण्याची मागणी केली. मनसे कार्यकर्त्यांनी नागपुरातील अॅमेझॉन कार्यालयाची तोडफोड केल्याचा व्हिडिओही इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये, भगवे झेंडे घेऊन काही महिलांसह मनसे कार्यकर्ते अॅमेझॉनच्या कार्यालयात घुसताना आणि कार्यालयातील मालमत्तेची तोडफोड करताना दिसत आहेत. मनसेचे नागपूर शहराध्यक्ष चंदू लाडे आणि विशाल बडगे यांच्या नेतृत्वात हे आंदोल करण्यात आलंय. चंदू लाडे यांनी पुरावा म्हणून अॅमेझॉनवरुन ॲानलाईन पाकिस्तानचा झेंडा मागवला. त्यानंतर आज अॅमेझॉन विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

Published on: Aug 22, 2023 06:33 PM