थिएटरमध्येही वाजणार ‘भोंगा’; मनसेकडून पत्रकार परिषदेत घोषणा
राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून (Loudspeaker) चांगलंच राजकारण तापलंय. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 1 मे रोजी औंरगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं जाहीर केलंय.
राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून (Loudspeaker) चांगलंच राजकारण तापलंय. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 1 मे रोजी औंरगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं जाहीर केलंय. तर 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारला इशारादेखील दिला आहे. आता याच विषयावरून मनसेनं आणखी एक निर्णय घेतला आहे. मशिदींवर भोंगे हटवण्याच्या भूमिकेला आणखी जोर देत मनसेनं आता ‘भोंगा’ (Bhonga) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांच्या हस्ते ‘भोंगा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Published on: Apr 21, 2022 02:46 PM
Latest Videos