अमित ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर जाण्याचं कारण काय?; अमित यांनीच सांगितलं कारण

अमित ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर जाण्याचं कारण काय?; अमित यांनीच सांगितलं कारण

| Updated on: Feb 03, 2023 | 12:31 PM

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सांगितले कारण...

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसंदर्भातील अनेक प्रश्न आहेत. हा प्रश्न पेटला तर राज्यभर पेटणार, त्यामुळे हे प्रश्न मी मुंबईत बसून देखील सोडवू शकतो. मात्र प्रत्यक्ष महाराष्ट्राचा दौरा करून प्रत्येक विद्यार्थ्यांची अडचण, समस्या जाणून घेण्यासाठी पक्ष मोर्चे बांधणी करत आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवले जातील, यासाठी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सांगितले आहे. निवडणुकांबाबत बोलताना अमित ठाकरे म्हणाले, उमेदवारी कोणाला द्यायची हे साहेब ठरवतात. उमेदवार देणं ही पक्ष अध्यक्षांची जबाबदारी असते. तरीही आपल्याकडे निवडणूक हरलो की साहेब हरले आणि जिंकलो तर पक्ष जिंकला असे म्हटले जाते. म्हणून असे निर्णय तेच घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंढरपूरला आल्यानंतर अमित ठाकरे यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी विठुरायाकडे काय मागितले असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, मी देवाला काही मागत नसतो देवाचे दर्शन घेतल्याने पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते म्हणून देवाचे दर्शन घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अमित ठाकरे हे पंढरपुरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Published on: Feb 03, 2023 12:29 PM