एमआयएम विरोधात मनसेचं आंदोलन, पोलिसांनी मोर्चा रोखला; पाहा…
MNS Andolan : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज एमआयएम विरोधात मोर्चा काढण्यात आला. पण हा मोर्चा पोलिसांनी अडवला. पाहा व्हीडिओ...
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज एमआयएम विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात एमआयएम आणि आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधील संस्थान गणपतीपासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता. पण संस्थान गणपतीपासून काही अंतरावरच हा मोर्चा अडवण्यात आला. या मोर्चाला या आधीच परवानगी नाकारण्यात आली होती. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढण्यावर ठाम होती. अखेर पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला.
Latest Videos