‘बौद्धिक दिवाळखोर, तातडीने अटक करून कठोर शासन करा’, राहुल सोलापूरकरवर मनसे नेता भडकला
वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, असं वक्तव्य करत राहुल सोलापूरकर याने नवा जावई शोध लावला आहे. दरम्यान, अभिनेता राहुल सोलापूरने केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून एकच संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले.
अभिनेता राहुल सोलापूर हा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं वक्तव्य करत राहुल सोलापूरकरने शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बोलताना तो पुन्हा बरळल्याचे पाहायला मिळाले. वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, असं वक्तव्य करत राहुल सोलापूरकर याने नवा जावई शोध लावला आहे. दरम्यान, अभिनेता राहुल सोलापूरने केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून एकच संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुवाद्यांच्या डोक्यामधलं चातुरवर्णांचं भूत कधीही जाणार नाही. जो शिकलेला असेल, जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल. हा सोलापूरकर बोलतोय आणि तो बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो. आता याच्या कानाखाली जाळ काढला की याच्यातला मनुवाद बरोबर जागा होईल’, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. तर आज मनसे नेत्यानंही एक ट्विट करत सोलापूरकरवर निशाणा शाधला. ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल- अपमानास्पद वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या बौद्धिक दिवाळखोर राहुल सोलापूरकरला तातडीने अटक करा’, असं म्हणत मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी संताप व्यक्त केलाय. तर राहुल सोलापूरकरला अत्यंत कठोर शासन करा, अशी मागणीही अविनाश अभ्यंकर यांनी केली आहे.