MNS on Kalyan Rada : 'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...', मनसे नेत्याकडून थेट वॉर्निंग

MNS on Kalyan Rada : ‘निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर…’, मनसे नेत्याकडून थेट वॉर्निंग

| Updated on: Dec 20, 2024 | 5:12 PM

कल्याण पश्चिम येथे अमराठी लोकांकडून भाषिक शेरेबाजीनंतर मराठी कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा मराठी भाषा हा मुद्दा चर्चेत आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाच्या पाठिशी असल्याचे पाहायला मिळत आहे.

कल्याणमधील मराठी माणसाला काल मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याघटनेसंदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट इशाकाच दिला आहे. ‘सतत मराठी माणसावर हल्ले होत आहेत. असे बरेच प्रकार घडले आहेत. या अमराठी माणसांना निवडणुकीनंतर माज आला आहे. आता हा माज उतरवण्याची गरज आहे. जरी मराठी माणूस निवडणुकीला मनसेच्या सोबत राहिला नसेल तरी मराठी माणसाच्या सोबत मनसे कायम सोबत असेल. पण अशीच पुढे कुठेही घटना घडली तर त्याचपद्धतीने मनसे त्यांना उत्तर देईल’, असा थेट इशाराच परप्रांतीय लोकांना मनसेकडून देण्यात आलाय. ‘कालच्या घटनेनंतर मनसेचे कार्यकर्ते तयारीत होतेच. पण सरकारने याबाबतीत हस्तक्षेप केला पाहिजे. सरकार बदलल्यापासून नवीन सरकार आल्यापासून या घटना वाढत चालल्या आहेत. महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी अशा घटना योग्य नाहीत. जर या घटना थांबल्या नाहीत तर मनसेच्या रागाला सामोरे जावे लागेल.’, असा इशाराच अविनाश जाधव यांनी दिला. पुढे ते असेही म्हणाले, सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मराठी आमदार असतील कारण सगळे आता परप्रांतिय झाले आहेत. जर एखादा मराठी आमदार असेल तर त्याने हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे, मराठी माणसाच्या संरक्षणासाठी सरकार करणार काय? असा सवाल करत मराठी माणसाच्या संरक्षणासाठी एखादा कायदा करावा, अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली.

Published on: Dec 20, 2024 05:12 PM