औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला होता आता नाही - बाळा नांदगावकर

औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला होता आता नाही – बाळा नांदगावकर

| Updated on: Apr 29, 2022 | 1:38 PM

औरंगाबाद शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला होता. आता नाही. जर बालेकिल्ला आहे तर मग एमआयएमचा खासदार का निवडून येतो, असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी विचारला आहे.

औरंगाबाद शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला होता. आता नाही. जर बालेकिल्ला आहे तर मग एमआयएमचा खासदार का निवडून येतो, असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी विचारला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांची सभा होत आहे, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. त्यांनी यावेळी शिवसेनेवर टीका केली. लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. एवढी वर्ष महापालिका तुमच्या ताब्यात असताना तुम्ही काय केले? अजूनही पाण्यासाठी हंडा मोर्चा काढावा लागतो, हे दुर्दैव आहे. सभा ही कोणाचे रेकॉर्ड मोडण्यासाठी नसते तर सभा ही विचारांचे सोने लुटण्यासाठी असते, असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

Published on: Apr 29, 2022 01:38 PM