MNS News : ‘आलमगीर औरंगजेब..’, दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी
MNS Banners In Dadar : मुंबईच्या दादर भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीबद्दल भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता ही बॅनरबाजी केली जात आहे.
मुंबईच्या दादर परिसरात मनसेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात येत आहे. ‘महाराष्ट्राशी तब्बल 27 वर्ष झुंजणारा सम्राट इथेच संपला. होय, इथेच औरंगजेबाला गाडला’, असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात औरंगजेबाच्या कबरी संदर्भात आपली भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर आता दादर येथे मनसेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. होय इथेच आलमगीर औरंजेबाला गाडला गेला अशा आशयाचे हे बॅनर आज दादर परिसरात झळकलेले बघायला मिळाले आहे. याआधी संभाजीनगर येथे खुलताबादला ज्या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे त्या रस्त्यावर देखील मनसेने अशा प्रकारे बॅनरबाजी केलेली बघायला मिळाली होती. त्यानंतर आता मुंबईत देखील हे बॅनर बघायला मिळाले आहेत.

पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच

'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'

...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट

भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
