हाताला काहीच लागणार नाही, विशेष अधिवेशनावर राज ठाकरे यांचं भाष्य; तर मनोज जरांगे म्हणाताय...

हाताला काहीच लागणार नाही, विशेष अधिवेशनावर राज ठाकरे यांचं भाष्य; तर मनोज जरांगे म्हणाताय…

| Updated on: Feb 19, 2024 | 5:59 PM

'हा विषय राज्याचा नाही, हा केंद्राचा आणि सुप्रीम कोर्टाचा विषय आहे. यात काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. ते सुटल्याशिवाय हा विषय पुढे जाणार नाही. सर्व झुलवलं जातयं, भुलवलंय जातंय. हाताला काही लागणार नाही. मी त्या दिवशी त्यांच्यासमोरच जाऊन सांगितलं'

मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, विशेष अधिवेशनाने काही होणार नाही. हा विषय राज्याचा नाही, हा केंद्राचा आणि सुप्रीम कोर्टाचा विषय आहे. यात काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. ते सुटल्याशिवाय हा विषय पुढे जाणार नाही. सर्व झुलवलं जातयं, भुलवलंय जातंय. हाताला काही लागणार नाही. मी त्या दिवशी त्यांच्यासमोरच जाऊन सांगितलं, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तर यासंदर्भात मनोज जरांगे पाटील म्हणाले, केंद्रातील मराठा आरक्षण आणि आमचा विषय वेगळा आहे. पुन्हा मराठ्या पोरांच्या नशीबात तेच येईल. ज्या पोरांच्या हातात लेखणी हवी त्या पोरांच्या हातात आंदोलन आलं. त्यांचं वय आंदोलन करता करात निघून गेलं. पुन्हा २ ते ३ जणांच्या हट्टापायी सरकार वेगळ आरक्षण लादतंय असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Published on: Feb 19, 2024 05:59 PM