Raj Thackeray | राज ठाकरे यांनी सांगितलं मुंबई गोवा महामार्ग रखडवण्यामागचं नेमकं ‘अर्थकारण’

| Updated on: Aug 27, 2023 | 10:43 PM

Raj Thackeray On Mumbai Goa Highway Kolad | मुंबई-गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय. या मागे षडयंत्र असल्याचा संशय राज ठाकरे यांनी बोलून दाखवला.

कोलाड | मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरुन मनसे चांगलीच आक्रमक झाली. राज ठाकरे यांची पनवेलमध्ये काही दिवसांपूर्वी या महामार्गाच्या मुद्द्यावरुन सभा पार पडली. त्यानंतर मनसैनिकांनी कोकण पट्ट्यात विविध ठिकाणी टोलनाक्यांची तोडफोड केली. यावरुन राजकारणही तापलं. त्यानंतर खळखट्ट्याक झाल्यानंतर मनसेने गांधीगिरीची वाट चोखाळली. महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामावरुन मनसेने कोकण जागर यात्रा काढली.

पळस्पे फाटा ते खारपाडा दरम्यान कोकण जागर यात्रा काढली. मनसेच्या या जागर यात्रेत अनेक नेते सहभागी झाले. अमित ठाकरे यांनी यात्रेचं नेतृत्व केलं. मनसेच्या या जागर यात्रेत कोकणातील असंख्य नागरिक सहभागी झाले. मोठ्या प्रमाणात कोकणकरांनी हजेरी लावल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कोलाडमध्ये झालेल्या सभेत सर्वांचे आभार मानले. इतकंच नाही, तर राज ठाकरे यांनी गेली अनेक वर्ष या महामार्गाचं काम का रखडलंय याचं कारण सांगत मोठा दावा केलाय.

राज ठाकरे काय म्हणाले?

“ह्या मागे मला एक षडयंत्र जाणवतंय. आज कोकणातील बांधवांच्या जमिनी स्वस्तात विकत घ्यायच्या.पुढे रस्ता चांगला झाला की अव्वाच्या सव्वा भावाने व्यापाऱ्यांना विकायच्या.  हे सर्व आपलीच लोकं करत आहे. कुंपणच शेत खात असेल तर करायचं काय? माझी कोकणातील बांधवांना हात जोडून विनंती आहे की जमिनी विकू नका”, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

“तसेच कितीही आमिषं दाखवली, कितीही दबाव आणला तरी जमीनी विकू नका. बाकी ह्या व्यापाऱ्यांचे काय करायचं ते आम्ही बघून घेतो. तुम्ही जमीन सोडू नका म्हणजे झालं”, असं आवाहन राज ठाकरे यांनी कोकणवासियांना केलं.

Published on: Aug 27, 2023 10:43 PM