Raj Thackeray : 'लाडकी बहीण' योजनेवर राज ठाकरे स्पष्टच बोलले, ‘...नाहीतर मी त्याला लाच म्हणेन’

Raj Thackeray : ‘लाडकी बहीण’ योजनेवर राज ठाकरे स्पष्टच बोलले, ‘…नाहीतर मी त्याला लाच म्हणेन’

| Updated on: Nov 11, 2024 | 8:05 PM

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’वर मुलाखत दिली आहे. मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले.

लाडकी बहीण योजना टिकली दर महिन्याला टिकवता आलं तर मी त्याला गिफ्ट म्हणेल. टिकवता आली नाही तर त्याला ब्राईब म्हणेल, असं म्हणत राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन आपले स्पष्ट मत व्यक्त केले. पुढे राज ठाकरे म्हणाले, मला इतर राजकारण्यांसारखं नाही वागता येणार. तशी अपेक्षा करणार असाल तर ते होणार नाही. चांगल्याला चांगलं म्हणणं वाईटाला वाईट म्हणणार. मला वाटतं प्रत्येकाने ही गोष्ट केली पाहिजे. याचा अर्थ भूमिका बदलत आहात असं होत नाही. स्वार्थासाठी केलं तर ती गोष्ट लागू होते. जर तुमचा ज्यात स्वार्थ नसेल एखादी भूमिका पटली तर तुम्ही चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे, असे मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. पुढे राज ठाकरे असेही म्हणाले, लाडकी बहिणीला विरोध नाही. यातून राज्याच्या तिजोरीवर भार नाही ना येत. राज्यावर कर्ज वाढणार नाही ना. आर्थिक दृष्ट्या या गोष्टी करेक्ट असतील तर द्या. गडकरींनीही या योजनेला आक्षेप घेतला आहे. एखादी गोष्ट तुम्ही देताय ती देणं शक्य असेल तर करा. पण निवडणुकीच्या तोंडावर दोन महिने केली आणि उद्या नाही करता आली तर त्याला लाच म्हणावी लागेल. मेंटेन करता आली तर भेट म्हणावी लागेल. केंद्राकडून पैसे मिळतील तर आनंद आहे. महिलांना पैसे मिळू नये विचाराचा नाही.

Published on: Nov 11, 2024 08:05 PM