Raj Thackeray : मनमानी कारभार अन् दहशत, राज ठाकरेंचा संताप; वक्फ दुरुस्ती विधेयकासंदर्भात काय म्हणाले?

Raj Thackeray : मनमानी कारभार अन् दहशत, राज ठाकरेंचा संताप; वक्फ दुरुस्ती विधेयकासंदर्भात काय म्हणाले?

| Updated on: Dec 09, 2024 | 3:56 PM

लातूरमधील एका घटनेचा दाखला देत राज ठाकरे यांनी मोदी सरकारकडे ही मागणी केली आहे. तर वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला महाविकास आघाडीचा विरोध होता, असंही म्हणत वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराला चाप कसा बसणार? राज ठाकरेंचा सवाल

विरोधाला बळी न पडता वक्फ दुरूस्ती विधेयक आताच मंजूर करून घ्या, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. लातूरमधील एका घटनेचा दाखला देत राज ठाकरे यांनी मोदी सरकारकडे ही मागणी केली आहे. तर वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला महाविकास आघाडीचा विरोध होता, असंही म्हणत वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराला चाप कसा बसणार? राज ठाकरे यांनी संतापजनक सवाल केला आहे. लातूरमधील एका जमिनीवर वक्फ बोर्डाकडून दावा करण्यात आला आहे. यानंतर राज ठाकरे यांनी सरकारला हा थेट सवाल केला आहे. राज ठाकरेंनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात राज ठाकरेंनी वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकात नक्की काय होतं याबद्दलची माहिती दिली आहे. ‘जमिनीपुरता प्रश्न नाही, वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार? काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्र सरकारने सादर केलं होतं, त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं. या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती, हे वेगळं सांगायला नको.’, असं राज ठाकरे म्हणाले.

Published on: Dec 09, 2024 03:56 PM