अन् राज ठाकरे भडकले, म्हणाले...मी काही ज्योतिषी आहे काय?

अन् राज ठाकरे भडकले, म्हणाले…मी काही ज्योतिषी आहे काय?

| Updated on: May 14, 2023 | 2:19 PM

VIDEO | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या दणदणीत विजयावर राज ठाकरे यांचं पहिल्यादांच भाष्य

ठाणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या दणदणीत विजयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पहिल्यादांच भाष्य केले आहे. ते म्हणाले,  विरोधी पक्ष कधी जिंकत नाही. सत्ताधारी हरत असतात. हा स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करु शकतो? अशा प्रवृत्तीचा पराभव आहे. जनतेला कधीही गृहित धरू नका हा त्यातील बोध आहे. सर्वांनीच त्यातून बोध घ्यावा, असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला नाव न घेता लगावला. तर कर्नाटकाच्या निकालाने महाराष्ट्रात बदलाचे संकेत आहेत असं वाटतं का? त्यावर राज ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं नाही. आता काय सांगू शकणार? आता कर्नाटकाचा निकाल लागला आहे. पुढे काय आणि कसं कसं घडतं हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या निकालावरून आताच महाराष्ट्राबाबत भाष्य करता येणार नाही, असं राज यांनी स्पष्ट केलं. कर्नाटकाच्या विजयात भारत जोडो यात्रेचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतो. बातम्या दाबल्या तरीही भारत जोडो यात्रेचा प्रभाव दिसतोय. तुम्ही कितीही नाकारलं तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे. मात्र पुढे हा प्रभाव राहील की नाही माहीत नाही. ते सांगायला मी काही ज्योतिषी आहे काय? असा सवाल त्यांनी केला अन् ते काहीसे भडकल्याचे पाहायला मिळाले.

Published on: May 14, 2023 02:18 PM