वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या कार्यकर्त्यांनाच राज ठाकरे यांनी फटकारलं, पण का?
VIDEO | ...म्हणून राज ठाकरे यांनी शुभेच्छा द्यायला आलेल्या उत्साही कार्यकर्त्यांना फटकारलं
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आज 55 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. शिवतीर्थ या निवासस्थानाला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. हजारोंच्या संख्येने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता राज्यभरातून कार्यकर्ते येणार असल्याकारणाने पोलिसांची सुरक्षा व्यवस्था त्यासोबत खाजगी सुरक्षा व्यवस्था शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आलेली आहे. शिवतीर्थ या निवासस्थानाच्या बाहेरील रस्त्यावर बॅरिगेट लावण्यात आले आहेत आणि रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दादरच्या सर्व भागांमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. “भावी मुख्यमंत्री” असा उल्लेख असलेला बॅनर सुद्धा कार्यकर्त्यांकडून झळकवण्यात आलेला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल होते. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना फटकारल्याचे पाहायला मिळाले.