Raj Thackeray यांच्याकडून पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांची पोलखोल
tv9 Special report | सभेत लाव रे तो व्हिडीओ म्हणणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भर पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे लावलेत 7 व्हिडीओ, या 7 व्हिडीओपैकी 3 व्हिडीओ फडणवीसांचेच..
मुंबई, १० ऑक्टोबर २०२३ | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपला मोर्चा टोलनाक्यांकडे वळवलाय. ऐरव्ही सभेत लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज ठाकरे पोलखोल करतात. मात्र यावेळी भर पत्रकार परिषदेत फडणवीसांपासून ते उद्धव ठाकरेंचे एकूण 7 व्हिडीओ त्यांनी लावलेत. तर छोट्या वाहनांना टोलमुक्ती न दिल्यास टोल जाळण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. महाराष्ट्रातल्या सर्वच टोलनाक्यांवर कारसह छोट्या गाड्यांना टोल नाही, असं फडणवीस म्हणालेत. आणि आता जर छोट्या वाहनांकडून टोल घेतला तर मनसेचे कार्यकर्ते टोल नाके जाळतील असा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलाय. राज ठाकरेंनी टोलच्या विषयावर सलग दुसऱ्या दिवशीही पत्रकार परिषद घेतली आणि भर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंपासून अजित पवार ते फडणवीसांपर्यंत सर्वांचेच व्हिडीओ लावले. विशेष म्हणजे 7 व्हिडीओपैकी 3 व्हिडीओ फडणवीसांचेच आहेत, बघा राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना का घेरलं?