तुमचे चोचले खूप पुरवले, झालं तेवढं खूप झालं राज ठाकरेंचा मनसैनिकांना दम !

“तुमचे चोचले खूप पुरवले, झालं तेवढं खूप झालं” राज ठाकरेंचा मनसैनिकांना दम !

| Updated on: Aug 23, 2022 | 3:41 PM

जर उणीदुणी काढत असाल तर काढून तर बघा. कुणी जर काढलं असेल तर माझ्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, असा दमच राज ठाकरे यांनी यावेळी मनसेच्या पदाधिकारी आणि मनसैनिकांना दिला आहे.

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या अनुशंगाने मनसे पदाधिकाऱ्यांना आयोजित कार्यक्रमात बोलत होते.पक्षातील वाद सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करणाऱ्यांचे राज ठाकरे यांनी यावेळी चांगलेच कान उपटले. मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलंय. ते म्हणाले की, ‘पदाधिकाऱ्याने पदाधिकाऱ्याने पक्षातल्या पक्षात व्हॉट्सअप सोशलम मीडियात फेसबुकवर कोणत्याही प्रकारच्या कमेंट केल्या तर त्याला एकक्षणही पक्षात ठेवणार नाही हे लक्षात ठेवा. तुमचे चोचले खूप पुरवले. झालं तेवढं खूप झालं. तुमचं काम सांगायचं असेल तर त्या माध्यमाचा उपयोग करा. जर उणीदुणी काढत असाल तर काढून तर बघा. कुणी जर काढलं असेल तर माझ्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, असा दमच राज ठाकरे यांनी यावेळी मनसेच्या पदाधिकारी आणि मनसैनिकांना दिला आहे.

 

 

 

 

Published on: Aug 23, 2022 03:41 PM