कसबा, चिंचवडबाबत मनसेची भूमिका काय? यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

कसबा, चिंचवडबाबत मनसेची भूमिका काय? यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Jan 31, 2023 | 7:45 AM

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार असून नोकरभरतीवरील चर्चेसह आदिवासी समाजासंदर्भात महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता

राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी ११ वाजता बैठक होणार असून नोकरभरतीवरील चर्चेसह आदिवासी समाजासंदर्भात महत्त्वाच्या निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यातील कसबा, चिंचवड पोट निवडणुकीसाठी आजपासून अर्ज, मात्र मविआ आणि भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. मनसेच्या कोअर कमिटीची आज पुण्यात बैठक होणार असून कसबा, चिंचवड बाबत मनसेची भूमिका काय असणार? हे ठरण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह मिळण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे उत्तर सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आता केंद्रीय आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुळ पक्ष आम्हीच असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

संजय राऊतांच्या धमकीमुळे आमचे आमदार पळाले, शिंदे गटाच्या उत्तरात संजय राऊत यांचा उल्लेख तर राऊत किस झाड की पत्ती, शिंदे गटातील भरत गोगावले यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published on: Jan 31, 2023 07:45 AM