फक्त घराबाहेर पड... कपडे फाडून मारु, मनसेच्या प्रशांत गीड्डे यांचा उबाठा नेत्याला इशारा

फक्त घराबाहेर पड… कपडे फाडून मारु, मनसेच्या प्रशांत गीड्डे यांचा उबाठा नेत्याला इशारा

| Updated on: Apr 12, 2024 | 12:53 PM

शरद कोळी यांनी राज ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गीड्डे यांनी पलटवार करत उबाठा गटाचे नेते शरद कोळी हा मोठा ब्लॅकमेलर असल्याचा आरोप केलाय. तर शरद कोळी यांनी विना संरक्षण गावातून फिरून दाखवण्याचे आवाहनही मनसेने केले आहे.

उबाठा गटाचे नेते शरद कोळी यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आक्रमक बोलून शरद कोळी यांनी जे मिळवलेले सरकारी संरक्षण आहे ते सरकारने काढून घ्यावे यासाठी मनसेकडून पोलीस अधीक्षकांना एक पत्र देखील देण्यात येणार आहे. दरम्यान, शरद कोळी यांनी राज ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गीड्डे यांनी पलटवार करत उबाठा गटाचे नेते शरद कोळी हा मोठा ब्लॅकमेलर असल्याचा आरोप केलाय. तर शरद कोळी यांनी विना संरक्षण गावातून फिरून दाखवण्याचे आवाहनही मनसेने केले आहे. शरद कोळी विना संरक्षण घराबाहेर पडून दाखव, कपडे फाडून मारू, असा मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गीड्डे यांनी इशारा दिला पुढे त्यांनी असेही सांगितले की, राज ठाकरे यांना इन्कम टॅक्स, ईडी अशी कुठलीही धमकी आलेली नाही. देशातील परिस्थिती पाहून आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला असल्याचे प्रशांत गीड्डे यांनी सांगितले.

Published on: Apr 12, 2024 12:53 PM