फडणवीस, दादा नव्हे, 'या' नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली? राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत मोठा गौप्यस्फोट

फडणवीस, दादा नव्हे, ‘या’ नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली? राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Jan 07, 2025 | 4:56 PM

मनसेची महायुतीसोबतची बैठक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच फिस्कटली असल्याचे मनसेच्या मुंबईतील काही नेत्यांचं असं म्हणणं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज ठाकरेंनी बोलावलेल्या मनसेच्या या बैठकीतून मोठा गौप्यस्फोट करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतिर्थ’ या निवासस्थानी ही बैठक पार पडली. मनसेची महायुतीसोबतची बैठक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच फिस्कटली असल्याचे मनसेच्या मुंबईतील काही नेत्यांचं असं म्हणणं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मनसे आणि भाजप विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकत्र येतील, असे संकेत मिळत होते. पण तसे काही घडलं नाही. मनसेला जी जागा लोकसभेत हवी होती त्या जागेवर शिवसेना दावा करत असल्याचे पाहायला मिळाले. तसेच मनसेला त्या जागेवर लढायचं असेल तर धनुष्यबाण चिन्हावर लढवावं लागेल, अशी शिवसेनेची भूमिका होती. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तो प्रस्ताव मान्य केला नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी देखील मनसे आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असताना शिवसेनेसोबत एकमत न झाल्यामुळे युती होऊ शकली नाही, याबाबत आज झालेल्या मनसेच्या बैठकीत चर्चा झाली आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुतीसोबत युती फिस्कटली असल्याचा सूर मनसे नेत्यांचा पाहायला मिळाला.

Published on: Jan 07, 2025 04:56 PM