संजय राऊत वेड्यांच्या रुग्णालयात होते की…’मनसे’चा राऊत यांच्यावर निशाणा
मनेसेच्या घे भरारी सभेत मनसेचे नेते गजानन काळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत वेड्यांच्या रूग्णालयात होते की कोठडीत असे म्हणत गजानन काळे यांनी सवाल उपस्थित केला आहे. यावेळी ते म्हणाले, मागच्या सत्तेत असणाऱ्यांची असो की आता सत्तेत असणाऱ्याची या मुंबईने आणि मुंबईकरांनी फक्त उद्घाटनं पाहिली आहेत. मुंबईची तुंबई […]
मनेसेच्या घे भरारी सभेत मनसेचे नेते गजानन काळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत वेड्यांच्या रूग्णालयात होते की कोठडीत असे म्हणत गजानन काळे यांनी सवाल उपस्थित केला आहे.
यावेळी ते म्हणाले, मागच्या सत्तेत असणाऱ्यांची असो की आता सत्तेत असणाऱ्याची या मुंबईने आणि मुंबईकरांनी फक्त उद्घाटनं पाहिली आहेत. मुंबईची तुंबई होत असताना याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. गेली २५ वर्ष या मुंबईची वाट ज्या सत्ताधाऱ्यांनी लावली आहेत त्यावर आदित्य ठाकरे आता पत्रकार परिषद घेत आहेत. ज्याला मनसे विरप्पन गँग असे म्हणते. आता ही गँग सक्रीय झाली आहे. याच्याच गँगमध्ये असणारे अभिजीत बिचकुले म्हणजे संजय राऊत हे सकाळी येतात, त्यांना केवळ बेळगाव प्रश्नाचे पडले आहे, असे म्हणत गजानन काळे यांनी राऊतांवर टीका केली आहे. यासह संजय राऊत वेड्यांच्या रूग्णालयात होते की कोठडीत असे म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.