दोन-पाच सभेनंतर जीवाला धोका, काळ्या मांजराला भिती; गजानन काळे यांच्याकडून सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा

दोन-पाच सभेनंतर जीवाला धोका, काळ्या मांजराला भिती; गजानन काळे यांच्याकडून सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा

| Updated on: Jan 23, 2023 | 7:55 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांची उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत गळाभेट घेतली. या भेटीवरूनही गजानन काळे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राहुल गांधी यांना भेटण्यापेक्षा एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांना विश्व प्रवक्ते संजय राऊत यांना भेटण्याची गरज आहे. तर सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना गजानन काळे म्हणाले की, पक्ष बुडाला तरी रोज सकाळी उठून संजय राऊत यांची विधाने सुरूच आहे. त्यात आता एक नवीन मांजर आली असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांचा उल्लेख काळी मांजर असा करत पुढे ते म्हणाले, दोन-चार सभा घेतल्यानंतर सुषमा अंधारे म्हणतायंत माझ्या जीवाला धोका आहे. पूर्वी म्हणत होत्या आपल्याला कोण हात लावतंय, काही वर्षांपूर्वी सुषमा अंधारे या काँग्रेस नेत्यांच्या बाजूला होत्या तिथे पत्रकार परिषद, त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंचावर पत्रकार परिषद घेतल्या. सगळीकडे डाळ नाही शिजली तर आता शिल्लक सेनेत.. (उद्धव ठाकरे गट), यासह त्यांनी सुषमा अंधारे यांना फिरता चषक असल्याचे म्हणत खोचक टोलाही लगावला आहे.

Published on: Jan 23, 2023 07:54 AM