Aditya Shiordkar Exclusive | मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश

Aditya Shiordkar Exclusive | “मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश”

| Updated on: Jul 17, 2021 | 1:59 PM

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी आज (16 जुलै) शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी आज (16 जुलै) शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जातोय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यात मनसेनेही दंड थोपटले आहेत. मात्र, त्याआधीच या पक्षांतराने मनसेची काळजी वाढवलीय.

आदित्य शिरोडकर म्हणाले, “मी माझी राजकीय कारकीर्द 2000 मध्ये सुरु केली होती, जेव्हा मी रुपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो. मी विद्यार्थी परिषद आणि रूपारेलच्या बीव्हीएस युनिटमध्ये सक्रिय होतो. माझी कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी या पदावर निवड झाली होती. कॉलेजमध्ये असताना एस.यू.एस.ने शिवाजी पार्क येथे “लता मंगेशकर” शो आयोजित केला होता. त्यामध्ये मी सक्रिय सहभाग घेतला आणि या कार्यक्रमासाठी रूपारेल बीव्हीएस युनिटमधूनही काम पाहत होतो. हा कार्यक्रम “भुज” भूकंप मदत निधीसाठी आयोजित करण्यात आला होता.”