मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती

मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती

| Updated on: Nov 07, 2024 | 6:03 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज ठाकरेंना आज मोठा धक्का दिला आहे. मनसेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्र यांनी मनसेची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटाचं शिवबंधन हाती बांधलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना मोठा धक्का दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षातील तरुण तडफदार नेत्यानं मनसे या पक्षाची साथ सोडत उद्धव ठाकरे गट शिवसेनेत प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे. मनसेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्र यांनी आज उद्धव ठाकरे गट शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, मनसे नेते अखिल चित्रे यांनी आज पक्षाला रामराम ठोकलंय आणि त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पण त्यापूर्वी त्यांनी आज दुपारी साडेतीन वाजता एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली. “अखेर मला पक्षाबाहेर ढकलण्यात त्यांना यश आलं. खंत एकच की, खंजीर समोरून नाही, मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला. राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे. सावध राहा. असो, जय महाराष्ट्र!”, असं अखिल चित्रे म्हणाले आहेत. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व मतदारसंघात मनसेकडून तृप्ती सावंत यांना विधानसभेचं तिकीट दिल्याने अखिल चित्रे हे नाराज असल्याची चर्चा ही होती. या चर्चेदरम्यान अखिल चित्रे यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि ठाकरेंची साथ धरली.

Published on: Nov 07, 2024 06:03 PM