Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amol Mitkari यांच्या 'त्या' टीकेवर मनसेनं दिला थेट हातपाय तोडण्याचा इशारा

Amol Mitkari यांच्या ‘त्या’ टीकेवर मनसेनं दिला थेट हातपाय तोडण्याचा इशारा

| Updated on: Oct 07, 2023 | 10:47 AM

tv9 Special Report | मुख्यमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे, अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेनंतर मनसे नेते अमेय खोपकर यांनी हात पाय तोडण्याची भाषा करत दिला थेट इशारा

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३ | मुख्यमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मिटकरींची ही टीका मनसेच्या नेत्यांना काही रुचली नाही. अमेय खोपकर यांनी मिटकरींना दिलेला इशारा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर अमेय खोपकर यांनी थेट इशाराच दिलाय. आमदार अमोल मिटकरी यांनी एका भाषणात बोलताना राज ठाकरेंना टोला लगावला. पक्ष वाढवण्यासाठी भाषण महत्त्वाचे नसते, तर बूथनुसार काम करावे लागते. कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते. भाषणावर आमदार निवडून येत असते, तर आज राज ठाकरे मुख्यमंत्री असते. मिटकरी यांच्या याच टीकेनंतर अमेय खोपकर यांनी हात पाय तोडण्याची भाषा केली आहे. मुख्यमंत्रीपदावर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा डोळा आहे. सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आपलाच नेता मुख्यमंत्री होणार असा दावा केला जातोय. त्यामध्ये मनसे नेतेही मागे नाही. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 07, 2023 10:47 AM