मनसे नेते अमित ठाकरे उदयनराजे भोसले यांच्या भेटीला, काय आहे कारण?
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची अमित ठाकरेंनी घेतली सदिच्छा भेट
दिनेश दुखंडे – मनसे नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. अमित ठाकरे हे सध्या त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली.
अमित ठाकरे हे आज सातारा दौऱ्यावर असून ते विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. साताऱ्यात पक्षाची मोर्चे बांधणी करण्यासाठी विशेषतः हा अमित ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या मनसे नेते अमित राज ठाकरे यांचे महासंपर्क अभियान राज्यात सुरु आहे. यानिमित्त अमित ठाकरे सातारा येथे आले असता फटाक्यांची आतषबाजी करत आणि साताऱ्यातील प्रसिद्ध अशा कंदी पेढ्यांचा हार घालत मनसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. तर महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण केलं.