Amit Thackeray | अमित ठाकरेंनी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची घेतली भेट
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar Suicide) नावाच्या तरुणाने पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) स्वप्निलच्या आई वडिलांच्या भेटीसाठी पुण्याला जात आहेत. अमित ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळेसुद्धा आहेत.

अमित ठाकरे मुंबईहून सकाळी 7 वाजता पुण्याकडे निघाले. स्वप्निल लोणकरने 29 जून रोजी पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहून “स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल आणि आपला ‘दिरंगाईचा खेळ’ कायमचा थांबवेल” अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर आता अमित ठाकरे स्वप्नीलच्या आई-वडिलांच्या सांत्वनासाठी पुण्याला जात आहेत. स्वप्निलला न्याय देण्याची मागणी करत काल नवी मुंबईत मनसेने शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात आंदोलनही केले होते.