अमित घरी आला, मुलगा घरी आल्यासारखं वाटलं; अमित ठाकरे भेटल्यानं उदयनराजे भारावले
उदयनराजे भोसले यांनी अमित ठाकरे यांचं साताऱ्यात केलं दिलखुलास स्वागत आणि म्हणाले...
मनसे नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. अमित ठाकरे हे सध्या त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांचं दिलखुलास स्वागत केले. अमित हा माझ्या खास मित्राचा मुलगा आहे. अमित घरी आल्यावर मला माझा मुलगा घरी आल्यासारखं वाटलं, अशी प्रतिक्रिया देताना उदयनराजे भारावल्याचे पाहायला मिळाले.
साताऱ्यात पक्षाची मोर्चे बांधणी करण्यासाठी विशेषतः हा अमित ठाकरे यांचा हा दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान अमित ठाकरे यांनी उदयनराजेंची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अमित यांना त्यांच्या हातून मोठं कार्य घडावं, अशा शुभेच्छा देत उदंड आयुष्यासाठी आशीर्वादही दिले. या भेटीदरम्यान, उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांना परफ्यूम दिलं. मॅन असं या परफ्यूमचं नाव असून त्यांनी अमित यांना म्हटलं की, आता तू लहान मुलगा नाहीस. तू माणूस आहे. तू आता सर्वांची काळजी घेतली पाहिजे. यू नो लाँगर स्मॉल बॉय, यू आर मॅन.. असं उदयनराजे यांनी म्हणताच पुन्हा हशा पिकला.