Raj Thackeray यांच्या सांगण्यावरून उपोषण सोडलं, असे म्हणत अविनाश जाधव यांनी काय दिला इशारा?

Raj Thackeray यांच्या सांगण्यावरून उपोषण सोडलं, असे म्हणत अविनाश जाधव यांनी काय दिला इशारा?

| Updated on: Oct 08, 2023 | 3:38 PM

VIDEO | मनसे नेते अविनाश जाधव यांचं आनंद नगर जकात नाका येथे गेल्या चार दिवसापासून उपोषण सुरू होतं. उपोषणाचा चौथ्या दिवशी अविनाश जाधव यांची प्रकृती खालावली होती, दरम्यान, आज राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली आणि उपोषण करणं आपला पिंड नाही, म्हणत त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले.

ठाणे, ८ ऑक्टोबर २०२३ | मुंबईतील टोलच्या दरात वाढीविरोधात मनसेने उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. मनसे नेते अविनाश जाधव यांचं आनंद नगर जकात नाका येथे गेल्या चार दिवसापासून उपोषण सुरू होतं. उपोषणाचा चौथ्या दिवशी अविनाश जाधव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचा बीपी कमी झाला आहे. शुगरची लेव्हलही कमी झाली आहे. जाधव यांना उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पण जाधव यांनी उपचार घेण्यास नकार दिला. दरम्यान, आज राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. अविनाश जाधव म्हणाले, उपोषण करण्याचा पिंड आपला नाही असे सांगत राज ठाकरे यांच्या आदेशानं मी माझं उपोषण मागे घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या विषयासंदर्भात चर्चा करेन त्या चर्चेतून मार्ग नाही निघाला तर आपण वेगळा मार्ग अवलंबून असं राज ठाकरे यांनी सांगितलं. जर मुख्यमंत्र्यांच्या चर्चेत काही सकारात्मक उत्तर राज ठाकरे यांना मिळाले नाही तर आम्ही आमचा आक्रमक मार्ग नक्कीच अवलंबू, असे म्हणत अविनाश जाधव यांनी इशारा दिला आहे.

Published on: Oct 08, 2023 03:38 PM