‘वज्रमूठ सभा म्हणजे…’, बीकेसी येथे होणाऱ्या ‘मविआ’च्या सभेपूर्वीच ‘मनसे’चा हल्लाबोल
VIDEO | महाविकास आघाडीच्या मुंबईतील बीकेसी येथे होणाऱ्या वज्रमूठ सभेवर मनसेचा निशाणा, काय केली टीका?
ठाणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी हे मुंबईच्या ठिकाणी हुतात्मा चौक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी बाईक रैली काढत मुंबईकडे रावाना झाले आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हुतात्मा चौक या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अभिवादन करणार आहेत. यासाठी मोठ्या संख्येने हुतात्मा चौक या ठिकाणी मनसे नेते अविनाश जाधव ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र चव्हाण सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हुतात्मा चौक या ठिकाणी रवाना झाले आहे. तसेच यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी महाविकास आघाडीच्या मुंबईतील बीकेसी येथे होणाऱ्या वज्रमूठ सभेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, आजची महाविकास आघाडीची वज्रमूठ ही सभा म्हणजे निव्वळ दिखावा असल्याचं भाष्य अविनाश जाधव यांनी केले तर दुसरीकडे महागाई आणि बेरोजगारीसाठी या सरकारने लवकरात लवकर पाऊल उचलावे असे आवाहन देखील अविनाश जाधव यांनी सरकारला केले आहे.