टोल आंदोलनासंदर्भात मनसेकडून अधिकृत भूमिका जाहीर, काय दिली सूचना?
VIDEO | टोल आंदोलनासंदर्भात पक्षाकडून सूचना येईपर्यंत कोणीही कुठलीही भूमिका घेऊ नये, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसैनिकांसह मनसे कार्यकर्त्यांना काय केलं आवाहन?
मुंबई, १० ऑक्टोबर, २०२३ | टोल आंदोलनासंदर्भात पक्षाकडून सूचना येईपर्यंत कोणीही कुठलीही भूमिका घेऊ नये, महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी फेसबुक पोस्ट करून ही पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी फेसबुक पोस्ट लिहीत हे आवाहन केले आहे. या पोस्टमध्ये बाळा नांदगावकर यांनी असे म्हटलंय की, महत्त्वाची सूचना जय महाराष्ट्र… टोल आंदोलनासंदर्भात पक्षाकडून सूचना येईपर्यंत तूर्तास कोणीही कुठलीही भूमिका घेई नये. सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी थेट टोलनाके जाळून टाकण्याचा इशारा दिला. यानंतर मनसेचे कार्यकर्ते आणि मनसैनिक टोल नाक्यावर पोहोचले होते. यानंतर त्यांनी कोणतीही चुकीची भूमिका घेऊ नये, म्हणून बाळा नांदगावकर यांनी ही अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.