घासलेट चोर अन् टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक… मनसे नेत्याचा कुणाला खोचक टोला?
राज ठाकरे यांनी अजित पवारांवर बोचरी टीका केली. यानंतर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींकडून राज ठाकरेंचा उल्लेख सुपारीबहाद्दर असा करण्यात आला आहे. यानंतर मनसे नेते गजानन काळे यांनी पलटवार केलाय. 'स्वतः चा पक्ष काढून २ आमदार निवडून आणावेत तुमच्या अजित दादांनी.. मग जाहीर मिशी कापू आम्ही...', थेट दिलं आव्हान
पुण्यातील पूरपरिस्थितीवरून राज ठाकरे यांनी अजित पवारांवर बोचरी टीका केली. यानंतर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींकडून राज ठाकरेंचा उल्लेख सुपारीबहाद्दर असा करण्यात आला आहे. यानंतर मनसे नेते गजानन काळे यांनी पलटवार केलाय. ‘७० हजार कोटीचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही, तर महाराष्ट्राला अजित पवार यांनी चुना लावला तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय …’, असं गजानन काळे यांनी म्हटलंय. तर स्वतः च्या घरातल्या सदस्याला एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राज ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर …, असाही हल्लाबोल गजानन काळे यांनी केला आहे. इतकंच नाहीतर हिम्मत असेल तर स्वतः चा पक्ष काढून २ आमदार निवडून आणावेत तुमच्या अजित दादांनी.. मग जाहीर मिशी कापू आम्ही… असे म्हणत गजानन काळेंनी अमोल मिटकरींना चॅलेंज दिलंय.