पुणेकरांचे तात्या अन् मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना सोडलं, पण का?
पक्षांतर्गत राजकारण आणि लोकसभा लढण्यापासून दूर ढकललं जात असल्याचा आरोप करत वसंत मोरे यांनी राजीनामा दिलाय. मात्र १७ वर्षांची मनसेची साथ सोडताना वसंत मोरे यांना अश्रू अनावर झालेत. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकी काय होती खदखद....
मुंबई, १३ मार्च २०२४ : पुण्याचे वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांना अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. पक्षांतर्गत राजकारण आणि लोकसभा लढण्यापासून दूर ढकललं जात असल्याचा आरोप करत वसंत मोरे यांनी राजीनामा दिलाय. मात्र १७ वर्षांची मनसेची साथ सोडताना वसंत मोरे यांना अश्रू अनावर झालेत. मनसेचे डॅशिंग आणि राज ठाकरे यांचे कधीकाळी जवळचे नेते अशी ओळख असलेले आणि पुणेकरांचे तात्या अर्थात वसंत मोरेंनी मनसेला अखेरचा राम-राम केला. पक्षांतर्गत होणाऱ्या कुरघोड्यांना कंटाळून आपण मनसेतून बाहेर पडत असल्याचे सांगताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झालेत. दरम्यान, वसंत मोरे पुण्यातून लोकसभा लढण्यात इच्छुक आहेत. आपली इच्छा त्यांनी राज ठाकरे यांच्या बोलूनही दाखवली. मात्र पुण्यातील कार्यकरणीतील नेत्यांनी कटकारस्थान करून नकारात्मक अहवाल राज ठाकरेंपर्यंत पोहोचवला पण बोलण्यासाठी वेळ मागूनही राज ठाकरेंनी वेळ दिला नसल्याचे वसंत मोरे म्हणाले. बघा नेमकी काय होती खदखद….