तुला तुडवणार अन् कुत्र्यासारखं मारणार, मनसे नेत्याची अमोल मिटकरींना उघड धमकी

तुला तुडवणार अन् कुत्र्यासारखं मारणार, मनसे नेत्याची अमोल मिटकरींना उघड धमकी

| Updated on: Jul 31, 2024 | 1:38 PM

अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबहाद्दर केला. यानंतर राज्यातील मनसैनिक संतापले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीवर अकोला येथे हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांच्या गाडीचं नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.

शरद पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबहाद्दर केला. यानंतर राज्यातील मनसैनिक संतापले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीवर अकोला येथे हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांच्या गाडीचं नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणानंतर मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी अमोल मिटकरींना उघड धमकी दिली आहे. “मी तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच. तुला कुत्र्यासारखं मारणार. हरामखोरासारखा बोलू नको. मर्यादा ठेव. मर्यादा पाळ. आम्ही कोणाच्या आई, बहीण किंवा वडीलधाऱ्यांबद्दल आम्ही बोलत नाही. ती आमची संस्कृती नाही. आम्ही पळवणारी लोक आहोत”, असेही कर्णबाळा दुनबळे यांनी सांगितले. ते असेही म्हणाले, जर अजित पवारांनी हात दिला नसता तर तुमची लायकी काय होती, हे लक्षात ठेवावं. त्यानंतर आपण कोणाबद्दल बोलतो याचा विचार करावा”, असे कर्णबाळा दुनबळे म्हणाले.

Published on: Jul 31, 2024 01:37 PM