'सुपारीबहाद्दर' म्हटल्यानं वाद थेट तुडवण्यापर्यंत....राज ठाकरेंवर टीका अन् मनसे आक्रमक

‘सुपारीबहाद्दर’ म्हटल्यानं वाद थेट तुडवण्यापर्यंत….राज ठाकरेंवर टीका अन् मनसे आक्रमक

| Updated on: Aug 01, 2024 | 10:29 AM

राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटल्याने मनसेचे सरचिटणीस कर्नबाळा दुनबाळे यांनी अमोल मिटकरींना पुन्हा इशारा दिलाय. दिसला की पुन्हा कुत्र्यासारखं तुडवणार, असं कर्णबाळा दुनबळे म्हणाले. “मी तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच. तुला कुत्र्यासारखं मारणार. हरामखोरासारखा बोलू नको. मर्यादा ठेव...''

अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केलेल्या एका वक्तव्यानंतर चांगलाच वाद झालेला आहे. हा वाद थेट अमोल मिटकरींची गाडी फोडण्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर एका मनसे कार्यकर्त्याचा हार्ट अॅटकने मृत्यू झाला. पण राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटल्याने मनसेचे सरचिटणीस कर्नबाळा दुनबाळे यांनी अमोल मिटकरींना पुन्हा इशारा दिलाय. दिसला की पुन्हा कुत्र्यासारखं तुडवणार, असं कर्णबाळा दुनबळे म्हणाले. “मी तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच. तुला कुत्र्यासारखं मारणार. हरामखोरासारखा बोलू नको. मर्यादा ठेव. मर्यादा पाळ. आम्ही कोणाच्या आई, बहीण किंवा वडीलधाऱ्यांबद्दल आम्ही बोलत नाही. ती आमची संस्कृती नाही. आम्ही पळवणारी लोक आहोत”, असेही कर्णबाळा दुनबळे यांनी म्हटले. तर यावर पलटवार करत अमोल मिटकरी म्हणाले, दुनबळेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? यांनी मोगलाई माजवण्याचा प्रयत्न करू नये, शेपटी नसलेल्या प्राण्याला अमोल मिटकरी पुरून उरलाय, असा इतिहास असल्याचे म्हणत मिटकरींनी कर्णबाळा दुनबळेंना इशारा दिला आहे.

Published on: Aug 01, 2024 10:29 AM