राज ठाकरे यांच्या सभेबाबत नितीन सरदेसाई म्हणतात, राजसाहेब ते नक्कीच बोलतील…
VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील सभेबाबत नितीन सरदेसाई यांची प्रतिक्रिया, बघा काय म्हणाले...
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मनसेचा गुढीपाडवा मेळावा येत्या २२ मार्च रोजी मुंबईतील दादरच्या शिवतीर्थावर होणार आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांची प्रतिक्रिया दिली आहे. राजसाहेब काय बोलणार याची उत्सुकता महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाच नव्हे, तर संपूर्ण देशाला लागून राहिली आहे. गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही गोष्टी घडल्या त्यावर राज ठाकरे बोलतील अशी अपेक्षा आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा ते काय बोलतील याची उत्सुकता असल्याचे नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे. यासह यंदाच्या सभेत कुणी दुसऱ्या पक्षातले विशेष अतिथी असणार का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले, आजवर जितक्या सभा झाल्या तितक्या आमच्या पक्षाच्याच होत्या, आणि त्यात कुणी वेगळं दिसलं नाही. त्यामुळे यावेळीही तसंच होईल, असं मला वाटतं. यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या जागा वाटपावरून केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केलें. ते म्हणाले, हा त्या दोन पक्षांचा वाद आहे, त्याबाबत आम्ही काही बोलणं योग्य ठरणार नाही. पाडव्याच्या दिवशी राजसाहेब नक्कीच बोलतील, असेही त्यांनी म्हटले.