अमोल मिटकरींवर ज्याने केला हल्ला; त्याच मनसे नेत्यासोबत फोटो, चर्चांना उधाण
अमोल मिटकरी आणि त्यांच्या वाहनावर हल्ला करणारे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा एकत्र फोटो समोर आला आहे. मागील महिन्यात अमोल मिटकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित मिटकरी यांच्या लेटर बुक तुला कार्यक्रमाला प्रमुख म्हणून पंकज साबळे यांनी लावली हजेरी होती
आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. अमोल मिटकरी आणि त्यांच्या वाहनावर हल्ला करणारे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा एकत्र फोटो समोर आला आहे. मागील महिन्यात अमोल मिटकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित मिटकरी यांच्या लेटर बुक तुला कार्यक्रमाला प्रमुख म्हणून पंकज साबळे यांनी लावली हजेरी होती. अमोल मिटकरी आणि पंकज साबळे यांचा फोटो समोर आल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अमोल मिटकरींच्या कार्यक्रमात पंकज साबळे यांनी उपस्थिती दर्शविली होती. मात्र पंकज साबळेंकडून नुकतीच अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्यात आला असून त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या या हल्ला प्रकरणानंतर मनसेच्या पंकज साबळे यांचं नाव समोर आलं आहे. दरम्यान, समोर आलेल्या पकंज साबळे आणि अमोल मिटकरी यांचा एकत्र फोटो सध्या चर्चेत आला आहे.