Raj Thackeray म्हणाले तर कोरड्या विहिरीत उड्या मारू, मनसे नेता असं का म्हणाला?
VIDEO | महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातील 25 लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार? लोकसभेच्या रिंगणात मनसे उतरणार? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना संभाव्य उमेदवारांची यादी देखील समोर आली आहे. संभाव्य उमेदवार असणाऱ्या मनसे नेत्यानं केलं मोठं वक्तव्य
संभाजीनगर, ७ ऑक्टोबर २०२३ | महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातील 25 लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तर या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावेसुद्धा समोर आले आहेत. छत्रपती लोकसभा मतदारसंघातून मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांचं नाव संभाव्य उमेदवार म्हणून समोर आलेले आहे. ‘माध्यमात आलेल्या बातम्यांची विश्वासार्हता काय? माझ्या नावाची चर्चा सुरू आहे. पण मनसेची रचना पाहता सर्व निर्णय राज ठाकरे घेतात. जोपर्यंत राज ठाकरे जोपर्यंत ती यादी जाहीर करत नाही तोपर्यंत हे केवळ माध्यमांचे अंदाज आहेत.’, असे प्रकाश महाजन म्हणाले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, आमची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी ताकत आहे, राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून लोक मनसेचा खासदार निवडून देतील. माझं वय 70 वर्षे आहे, पक्षाने तरुण नेत्याला संधी दिली तर चांगलं होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. राज ठाकरे यांनी सांगितल्यास कोरड्या विहिरीत उड्या मारू, आम्ही मनसे आणि राज ठाकरे यांचे निष्ठावंत सैनिक आहोत, अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली.