अंबादास दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून..., कुणाचा पलटवार?

अंबादास दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून…, कुणाचा पलटवार?

| Updated on: Mar 19, 2024 | 2:28 PM

अंबादास दानवे यांची बौद्धिक क्षमता नाही, अशा शब्दात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून मनसेवर अंबादास दानवे यांनी टीका केली होती. त्यावर मनसेचा पलटवार, अंबादास दानवे काही मोठा नेता नाही..

मुंबई, १९ मार्च२०२४ : नैतिकतेचा अंबादास दावने आणि त्यांच्या पक्षाचा काही संबंध नाही, पद मिळालं म्हणून माणसाला अक्कल येते असं नाही. अंबादास दानवे यांची बौद्धिक क्षमता नाही, अशा शब्दात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून मनसेवर अंबादास दानवे यांनी टीका केली होती. त्यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘तांत्रिक दृष्ट्या अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचं विधान परिषदेतील संख्याबळ घटलं आहे. अंबादास दानवे काही मोठा नेता नाही. उध्दव ठाकरे स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी दिल्लीला जाऊन कुणाचे पाय धरत होते. अंबादास दानवे यांनी उध्दव ठाकरे टाकतील तो तुकडा चघळवा’, असा टोलाही त्यांनी दानवेंना लगावला. दिल्लीच्या बादशाहच्या पाया पडायला गेले असतील. राज ठाकरे भाजपासोबत जातील, असे होऊ शकत नाही आणि गेले तर काहीतरी देतील, एखादा तुकडा टाकतील, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली. यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी अंबादास दानवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Published on: Mar 19, 2024 02:28 PM