‘भाजपनं शब्द मोडला, त्यांच्या पाठिंब्यावर संशय; आता कार्यालयात त्यांनी मौलानाचा फोटो…’, मनसे नेत्याचा घणाघात
विधानसभा निकालानंतर आता मनसेच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. या निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरं जावं लागलं यावर बोलताना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. या निकालानंतर आता मनसेच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. या निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरं जावं लागलं यावर बोलताना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाच्या आयुष्यात असे चढउतार येत असतात. पक्ष काम हे असं चालू राहिलं तर कार्यकर्ता पुढे येऊ शकतो, पक्ष पुढे येईल. तसेच कुठलाही चढ आणि उतार हा फार काळ टिकत नसतो. आमच्याही पक्षाचा चढ येईल असा मला विश्वास आहे. आमचा पक्ष कठीण काळातही उभा राहील आणि उभारी घेईल असा मला विश्वास आहे, असे प्रकाश महाजन म्हणाले. तर या निवडणुकीत स्वतः राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. तर भाजपच्या पाठिंब्यावर संशय घ्यावा अशी परिस्थिती आहे. इतर ठिकाणी भाजप आणि संघाने अजितदादांच्या उमेदवाराला मदत केली. मग आमच्या उमेदवारांना का नाही? अशी शंका प्रकाश महाजन यांनी उपस्थित केली. भाजपच्या नेत्यांनी अमित ठाकरे यांचा प्रचार केला नाही. त्यांनी शब्द मोडला आहे. भाजपने मौलाना नोमानीचा फोटो भाजप कार्यालयात लावला पाहिजे. नोमाणीने यादी जाहीर केली होती. त्यातील उमेदवारांना वेचून वेचून पाडलेलं आहे. त्यामुळे कौतुक आहे की हिंदू जागा झाल्यामुळे काय करू शकतो, असं प्रकाश महाजन म्हणाले.