Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'त 'मनसे'चा मुस्लिम अँगल,  नेमका कुणाला अन् का केला विरोध?

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’त ‘मनसे’चा मुस्लिम अँगल, नेमका कुणाला अन् का केला विरोध?

| Updated on: Jul 04, 2024 | 12:22 PM

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ नेमका कोणाला द्यावा, यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योजना लाडक्या बहिणीसाठी असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी त्यात बायकोचा विषय शोधून मुस्लिम अँगल जोडलाय.

योजना लाडक्या बहिणीसाठी असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी त्यात बायकोचा विषय शोधून मुस्लिम अँगल जोडलाय. मुस्लिम धर्मीय अशा योजनांचा फायदा घेतात. एकाहून अनेक पत्नी करतात. अनेक मुलं जन्माला घालतात. त्यामुळे सरकारने बायका सांभाळण्याची जबाबदारी सरकारने घेऊ नये, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय. सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मुस्लिम अँगल शोधून त्याला विरोध केलाय. एका व्यक्तीला तिनहून अधिक पत्नी असतील आणि एका महिलेला दोनहून अधिक अपत्य असतील तर अशांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे. मात्र प्रकाश महाजन यांनी आताची योजना आणि या आधीच्या योजना महाराष्ट्रात सुरू आहे त्यांचा अभ्यास सरकारने केला आहे का? अशीही शंका आहे.

Published on: Jul 04, 2024 12:22 PM